अग्रणी फाऊंडेशनचे सर्व सदस्य व कवठे महांकाळचे तहसिलदार सौ. शिल्पा ठोकडे मॅडम यांनीही खड्डे काढण्यापासून सर्व कार्यात सहभाग नोंदवून वृक्षारोपण केले. कवठे महांकाळ रोड, ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळेचा परिसर तसेच एम. के. जाधव हायस्कूल, मारुती मंदीर, रेल्वे मार्ग शेजारी, यल्लम्मा देवी मंदिर, महादेव मंदीर त्याच बरोबर सर्व गावातील रस्ते या सर्व ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले असून आज रोजी ही सर्व झाडे गावातील तरुण युवक व सर्व ग्रामस्थ यांच्या संगोपणाने सात फूट ऊंचीचे झाडे तयार झाले आहेत. अग्रणी पाणी फाऊंडेशन मार्फत सर्व लग्न समारंभात व वाढदिवसानिमित्त कलमी अंब्यांच्या झाडांची भेट दिली जाते. खड्डे काढून काळी माती घालून उत्तम प्रतीची झाडे आणुन जाळीचे कंपाऊड घालून स्व खर्चाने पाण्याचा टँकरचा वापर करून झाडे जगवण्यात येत आहेत. चालु वर्षी पावसाने पाठ फिरवली असली तरी या सर्व झाडांना जगवण्यासाठी सर्व युवक फेरीफेरीने सहभाग नोंदवून जगवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे सर्वांना नम्र विनंती ज्याच्याकडे वेळ आहे त्यानी वह देवून ज्यांना आर्थिक मदत शक्य आहे. त्यांनी आर्थिक मदत करून गाव हरितमय करण्यासाठी कोणत्याही स्वरुपाने सहभागी व्हावे असे आव्हान करित आहोत.
समस्त अग्रण धुळगावकर
1.बटरफ्लाय गार्डन - फुलपाखरू गार्डन 57 प्रकारचे वृक्ष
2.त्रिफळा वन - 3 प्रकारचे वृक्ष
3.पंचवटी - 5 प्रकारचे वृक्ष
4.वनशेती - 8 प्रकारचे वृक्ष
5.ओक्सीजन पार्क शतायुषी वृक्ष
6. बांबू वन - 23 प्रकारची बांबू लागवड
7.रानमेवा
8.पक्ष्यांचा ज्यूस बार - 63 प्रकारचे वृक्ष
9.चरक वन
9.बायोडिझेल