About Founder

प्राध्यापक. शिवदास भोसले सर

जसे चंद्रभागेच्या काठावर पंढरपूर वसले.तसे माझ्या अग्रणीच्या काठी माझे अग्रण धुळगाव गाव वसले. माझं गाव आणि पंढरपूर यात काही फरक नाही. पंढरपुरात टाळ-मृदुंगाचा आवाज नांदतो.आणि माझ्या पंढरपुरात किलबिलणारे टाळ- मृदुंग बागडतात. पंढरपुरात भक्तीचे, तालाचे, आनंदाचे, उत्साहाचे वातावरण खेळण्यासाठी कारणीभूत होते ते
विटेवरी उभे ते,
कमरेवर दोन्ही हात ते,
कपाळी पिंपळाचे पान ते,
असे विठ्ठल-रुक्मिणी ते...
आणि माझ्या पंढरपुरात हरितमय, जलमय, समृद्धमय, चैतन्यमय, सहकार्यमय, वातावरण निर्माण करण्यासाठी कारणीभूत होते ते ' प्राध्यापक. शिवदास भोसले सर '



जंगल उभारणारा शिवदास ....!

दोन दिसापूर्वी चांदोलीच जंगल बगाय गिततू वनविभागाच्या गाडीत बसून जंगल बगाय हरेक तरची, ततपची मानस सँग हुती. मानसांचा डोळा चुकवून योक तस्नाबांड गडी शिगरेट वडत हुता विचनीचा रव्या म्हनता आर काय जंगल पेटवायचाय काय तुला..? गड्यांन सिगरेट ईजवली. पन हिकडं शिग्रेट वडून जंगल पेटवनाऱ्या गड्याला बगून बोडक्या माळावर जंगल उभारनाऱ्या तीस वर्षाच्या अग्रनी धुळगावच्या शिवदास भोसलेच ध्यान झालं. बिहारच्या डोंगर फोडणाऱ्या मांझी गत त्यो जंगल उभारायला झपाटल्यागत काम करतूय का उभारतुय जंगल तर आमच्या येनाऱ्या पिढीला ऑक्सिजन मिळावा म्हनून.

अग्रनी धुळगाव ही नाव कसे पडले तर गावाच्या बाजूला अग्रनी नदी, आनी धूलोजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सरदार हुते. त्यावन अग्रनी धुळगाव आसनांव पडत हजार तोकसंख्येचा गाव कोरडवाह पावसाच्या पान्याव असल्याली पिक नदी उशाला आनी कोरड घशाता नदी आसून काय उपयोग? तेज्याव द्वीगभर आतीक्रमन वाळूउपसा, झाडं तोडायच प्रमान हाताच्या भारतवत बीएस्सी बीएड शिकल्यात आनी हाताला काम नसल्यात पोरगं गावात सार्वजनिक ठिकानी झाड लावायचे ठंड माळाला पारन डबरी काडताना हाताला फोड पाच तरीबी डबरी पाडायच. त्यात झाडं लावायच सावल्याल्या झाडासनी घागरीन पानी चालायच मानस म्हनायची हला याड लागलंय काय बगा हाय ती झाड जळून निगाल्याती आनी या सावाय लागताय पोटा पान्याच कामयाच बगायत सुडून दळीद्रीपना कुटन सूचला हेला ?

गावात चर्चा व्हायच्या, चांगलं वाईट तेज्या कानाव याचं. ह्या चर्चा घरापातूर आल्या. आय म्हनायची तुला आवडतय तर तू कर कोन काय म्हनतय ध्यान दिऊ नमो. घरातल्या आई नावाच्या विद्यापीठान शिवदासता परवानगी दिली. आता शिवदासला कुनी आपनाला चांगलं म्हनायचे सतीफिकेट बाद आस वाटलं नाव, त्यो झाडं लावायचा, पानी चालायचा का झाडं लावाय पायजिती गावाला सांगायचा काय आपकायची, कापजन सुन दयायची, त्यो झाडं तावतु न तेजा फायदा सान्या गावाला हुनाराम ही हळू हळू काय लोकांच्या धनात आत त्या मानसानी नेता मदत करायला सुरुवात किती कोन डबरी काडाय, कोन झाडे लावा, कोन पानी भाताय तर कोन सावत्याची काळजी घ्याय लागता

ही काम चालू आसताना क्रांतीवनाचे संपतराव पवार यांनी लुप्त झाल्यात्या आग्राणी नदीता परत वाहती करायचं ठरवलं, तेनी काम सुरू केले. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायवाड हेनीबी मनाव घिऊन नदीकाटच्या लोकांचं प्रबोधन करायला सुरुवात किली. नदी वाहती किती तर तुमचं दैन्य, दुःख संपल, विकासाची गंगा तुमच्या दारात यील. कलेक्टरन डोसक्यात घुसल आस सांगीतल्याव ती सान्यासनी पटतं. लोकसहभागातून काम सुरू झालं. गावात या कामात पुढाकार शिवदासन घेटला, तेच निस्वार्थी काम बगून गावात शिकल्यासवरल्यात्या नुकरी करनाऱ्या मानसांनी ह्या कामाला पैस दितं. पेस नसनारी मानस प्रत्यक्ष कामाच्या ठिकानी राबाय तागली. पात्रातत आतीक्रमन निगाली नदी मुकळी झाली. नदीवर बंधार घाट, पान्याने पात्र खचू नये म्हनून बाजूला बांबूची लागवड किली. नदीतला वाळू उपसा गावानं बंद केला. लोकासनी चांगल वाईट कळाय लागत

हेच कष्ट बगून निसर्ग बेभान हून पडला. आनी कुरडी पडल्याली नदी जिवंत झाली. नदीता पानी आत. सारा गाव शिवार हिरवागार झाला. तोक बागायती पिक ध्याय लागली. तंवर आमीर खानच्या पानी फौडेशनच्या स्पर्धेस सुरवात झाली. दुष्काळानं पिवल्पाली गाव झपाटल्यागत कामाला लागती. अग्रणी धुळगावात शिवदास तोकासनी ही सारे काय चालतंय सांगत हुता. हेजा गावाला फायदा काय सांगत त्यो सायासनी सहभागी काय सांगत झटत हुता. पण ठराविक मानस सुडली तर कोन तय याची हायत तांबनच अष्टपुत्र सौभाग्यवती म्हनत चौकात बसायची गावाला वन विभागाची दीगभर जमीन गाव व वनविभाग हेच्या सहकार्यान त्यावर जलसंधारणाच काम मशीनच्या साहाय्यान सुरू झाल

आडव्या चन्या मारून पळनार पानी तेनी आडवल बांध बंदिस्ती करून लाखो करोडो लिटर पानी तेनी गावाच्या शिवारात आडवल, पडस्पात पानी गावाच्या शिवारातन भायर गेलं नाय केल्याया कामाचा परिनाम गावाला दिसला. भर उन्हाळ्यात हिरी तोंडाला आतल्या काटा बसून तांब्यान पानी घ्यावे आशी परिस्थिती झाली. पानी आडत ? आता फूड काय? सह्याद्री देवराईच्या माध्यमातून झाडं निसर्ग पर्यावरण ह्यावर झपाटून काम करनारा संवेदशील अभिनेता सयाजी शिंदे सरांच काम बगून महाराष्ट्रातील झाडाव प्रेम करणारी लाखो मानसं झाड लावाय लागली, काय जन फोटो काडाय, सोशल मीडियावर मिरवाय झाडं लावाय लागली. पन शिवदास व गावातल्या मानसांनी अग्रनी फौंडेशनची स्थापना करून जलसंधारनांच काम केल्याल्या चरीत झाड लावाय सुरू केल. गावात रेल्वे ताईच्या कडला झाड लावती नुसती लावली न्हायत तर उनाळ्यात गोविराव भोसले, अशोक आप्पा भोसले, सदाशिव कनप चंद्रकांत भोसले, हिम्मत भोसले महेश कदम व गावातल्या पोरांनी रक्ताच पानी करून उनालंबर पानी घालून झाड जपती, त्यांच्या या प्रामाणिक कष्टाला शेकड़ी हातानी आर्थिक मदत दिऊन पाठबळ दिल.

शिवदासनच जंगल वनविभागाच्या जागेत २५ एकर जागेत ही जंगल उभ आहे. त्यात१४३ प्रकारची २४ हजार ७५० झाड हायत. काय झाड तीन वर्षांची तर काय पाच वर्षांची हायत तेनी लावलेली झाडे आज नजरेत भरण्यासारखी हायत शिवदासच्या गावात २८०० सैनिक हायत तोकासनी झाडांची आवड लागावी म्हणून तेन लय प्रयोग के एक फौजी एक वृक्ष ही संकल्पना राबवली. तसाच लेकीचं झाड, स्मृतीवन ह्या मुष्टी केल्या

तावलेल्या झाडाला नेमप्लेट लाऊन त्यावर तेच नाव लिहलं. लोक आत्मीयतेन झाड जपायला लागली. वृक्षभेट, झाड लावून वाढदिवस साजरा करण्यासाठी पोरांचं प्रबोधन करने आसतं भन्नाट प्रयोग तेन केलं. प्लॅस्टिक मुक्ती, पर्यावरण पूरक गणेशोत्सव आस अनेक उपक्रम तेन करून तेन पर्यावरन जपलय जंगल उभारल्याने अग्रनी धुळगाव गावाची जैव विविधता वाढल्या. राज्यात दोन नंबरच जैवविविधता उद्यान तेनी उभारलय. आता जमिनीत पाणी मुरतंय. शेकडो प्राणी, पक्षी कीटक या मातीला सुपीक करायता त्या झाडांचा आसरा घेत्यात. लावल्याल्या झाडांमधून गावाला इत्याकाय वर्षात लाखो रुपयाचे उत्पन्न मिळनाराय

आनी शुद्ध ऑक्सिजन व सावलीची तर काय किंमत करणार ? शिवदासच्या व गावच्या कामाची राज्यांन दखल घितल्या. राज्यातली नामांकित मानस, अभ्यासक, पर्यावरण प्रेमी, विविध संस्था, शाळा, कॉलेजची मुलं, प्रशासकीय अधिकारी भेट दिऊन तेन उभारलेल्या हिरव्यागार निसर्गाचा ही कस केलं म्हनून अभ्यास करत्यात. जाताना निसर्ग जपन्याच आश्वासन दिऊन जात्यात, शिवदासच्या निस्वार्थी कामाला विविध पुरस्कारांनी बळ दिलंय शिवदासचं काम पुस्तकात लिहून संपन्या सारख न्हाय प्रत्यक्ष जाऊन तेज काम बघितल्याव कळतं की ह्यो आधुनिक जंगलमैन हाय